भ्रष्टाचार मुक्त भारताचं मोदींचं स्वप्न, मग राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपने विचार करावा-केसरकर

भ्रष्टाचार मुक्त भारताचं मोदींचं स्वप्न, मग राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपने विचार करावा-केसरकर

"नारायण राणे हा विषय महाराष्ट्रासाठी मोठा नाही, कुणालाही पैशांच्या जीवावर राजकारण करता येत नाही"

  • Share this:

14 सप्टेंबर :  नारायण राणे हा विषय महाराष्ट्रासाठी मोठा नाही, कुणालाही पैशांच्या जीवावर राजकारण करता येत नाही असं म्हणत अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी राणेंच्या प्रवेशाला विरोध दर्शवलाय. तसंच भ्रष्टाचार मुक्त देश मोदींचं वाक्य आहे मग अशा नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याचा भाजपने विचार करावा असा सल्लाही दीपक केसरकर यांनी दिलीय.

कोकणात काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. आता नारायण राणे भाजपच्या उंबरठ्यावर उभे असल्यामुळे दीपक केसरकर यांनी टीका केली नाही तर ते नवलंय. नाशिकमध्ये जीएसटी संदर्भातील पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला.

नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाचा विषय हा महाराष्ट्रासाठी मोठा नाही, कुणालाही पैशांच्या जीवावर राजकारण करता येत नाही. जर मोठ्या प्रमाणात संपत्ती असलेल्या नेत्यांची यादी जाहीर झाली तर सगळं काही समोर येईल.

अशा नेत्यांना पक्षात घायचे आहे का नाही ते भाजपाने ठरवावे असा टोलाही केसरकरांनी लगावला. तसंच भ्रष्टाचार मुक्त देश हे पंतप्रधान मोदींचं वाक्य आहे. मग अश्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही भाजपाने विचार करावं असा सल्लाही त्यांनी दिला.

तसंच जीएसटी संदर्भात राज्यातील व्यापाऱ्यांनी वेळ देणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात काही वस्तूंचे कर कमी होतील. GST लागू झाल्यानंतर 50 कोटी महसूल वाढला अशी माहितीही केसरकरांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 07:09 PM IST

ताज्या बातम्या