बाबासाहेबांचे विचारच या देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी - पंतप्रधान

बाबासाहेबांचे विचारच या देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी - पंतप्रधान

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या जयंतीनिमित्त नागपूर इथे केलेल्या भाषणात मोदींनी आंबेडकरांची महती सांगितली.

  • Share this:

14 एप्रिल : 'डॉ. आंबेडकरांना आयुष्यात अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला, पण ही कटुता, बदल्याची भावना त्यांच्या वागणुकीतून, संविधानातून किंवा अधिकार क्षेत्रात दिसली नाही,' डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या जयंतीनिमित्त नागपूर इथे केलेल्या भाषणात मोदींनी आंबेडकरांची महती सांगितली. दीक्षाभूमीला भेट देऊन महामानवाला अभिवादन करून त्यांनी मनकापूर येथील डिजिधन मेळाव्याच्या कार्यक्रमात मराठीतून भाषणा सुरुवात केली. यावेळी त्यांनी भीम अॅपचं लोकार्पणही केलं.

मोदी म्हणाले, 'बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज प्रत्येक भारतवासियाला आपली स्वप्नं पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. बाबासाहेबांनी प्रत्येक वर्गाच्या विकासाची हमी दिली. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच या देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणा ठरणार आहेत.'

2022पर्यंत महापुरुषाच्या स्वप्नातला भारत आपण बनवू, असंही ते म्हणाले.

'बाबासाहेबांना अनेक संकटाचा सामना करावा लागला.पण त्यांच्या विचारांच्या उंचीने सर्व घटकांचा विकास पाहिला.बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी वैचारिक मंत्र दिला, त्यांच्या या प्रेरणेला आता मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे,' असं मोदी म्हणाले. पुढील पाच वर्षांत प्रत्येक तरुणानं देशाचा विकास करण्याचं स्वप्न बाळगावं, असा संदेश मोदींनी दिला.

2022ला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतायत. तोपर्यंत प्रत्येक गरीबाकडे घर असेल, असा विश्वास मोदींनी प्रकट केला.

भीम अॅपचं लोकार्पण करताना ते म्हणाले,'भीम अॅप अर्थव्यवस्थेतला मोठा घटक ठरणार आहे. ही प्रगतीची सुरुवात देशानं केलीय.' 14 आॅक्टोबरपर्यंत भीम अॅप मोबाईलमध्ये दिलं जाईल. आणि जो हे काम करेल त्याला पैसे मिळतील. यावेळी मोदींनी नागपूर एम्सही भूमिपूजन केलं

मोदींनी भाषणाची सुरुवात आणि शेवट मराठीत केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2017 03:03 PM IST

ताज्या बातम्या