मनसे कार्यकर्त्यांनी दिला पालिका अधिकाऱ्यांना कचरा भेट

"शहरातील जमा कचरा नियमित वेळच्या वेळी उचलला जात नाही परिणामी शहरात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे."

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2017 09:45 PM IST

मनसे कार्यकर्त्यांनी दिला पालिका अधिकाऱ्यांना कचरा भेट

 टिटवाळा,10 आॅक्टोबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या अनेक शहरात कचरा समस्येनं उग्र रूप धारण केलंय. याचाच निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी चक्क पालिकेच्या अधिकाऱ्यांना कचरा भेट दिलाय.

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन येऊन ठेपली असताना जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने येथील अनेक शहरांच्या बकालपणात वाढ झालेली आहे.  या विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेत आज या निषेधार्थ मनसे सरचिटणीस आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘अ’ प्रभागात पालिका अधिकाऱ्यांना कचरा भेट देत दिवाळी पूर्वी शहरात स्वच्छता न दिसल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा असा इशारा दिला आहे.

कचरा निर्मुलनासाठी पालिका  प्रशासनाकडून ठोस अश्या उपाययोजना होताना दिसत नाहीत. शहरातील जमा कचरा नियमित वेळच्या वेळी उचलला जात नाही परिणामी शहरात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. घंटा गाड्यांवर लाखोंची उधळण करूनही शहरात अस्वच्छता पसरली असून यामुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याच्या निषेधार्त आज ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुनिल पाटील यांना टिटवाळा तसंच आंबिवली मधून मनसेच्यावतीने कचरा भेट देत  निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर येत्या १५ दिवसांत शहरात कचरा नियमितपणे न उचलला गेल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा असा इशारा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 09:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...