S M L
Football World Cup 2018

ठाण्यात मनसैनिकांनी दुकानांचे इंग्रजी फलक फाडले

मराठी पाट्यांसाठी पुन्हा आंदोलन हाती घेणार अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणात केली होती. त्यानंतर सभा संपताच ठाणे स्थानकाबाहेरील असणारे इंग्रजी भाषेतील फलक मनसे कार्यकर्यांनी फाडले. ंमनसे स्टाईलमध्ये इंग्रजी पाट्या लावणाऱ्या दुकानदारांना दम दिला आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 19, 2017 01:50 PM IST

ठाण्यात मनसैनिकांनी दुकानांचे इंग्रजी फलक फाडले

ठाणे,19 ऑक्टोबर:  राज ठाकरेंची काल ठाण्यात सभा होती. सभा झाल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानकाबाहेर दुकानांचे इंग्रजी फलक फाडले. त्याचसोबत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

राज ठाकरेंच्या सभेला काल ठाण्यात प्रचंड गर्दी झाली होती. आपल्या  भाषणामध्ये राज ठाकरेंनी मराठी पाट्या आणि मराठीतून बँकांचे व्यवहार होण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यातूनच प्रेरित होऊन मनसे कार्यकर्त्यांनी ही तथाकथित कारवाई केल्याचं दिसतंय.

मराठी पाट्यांसाठी पुन्हा आंदोलन हाती घेणार अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणात केली होती. त्यानंतर सभा संपताच ठाणे स्थानकाबाहेरील असणारे इंग्रजी भाषेतील फलक मनसे कार्यकर्यांनी फाडले. ंमनसे स्टाईलमध्ये इंग्रजी पाट्या  लावणाऱ्या दुकानदारांना दम दिला आहे

त्यामुळे आता मराठी पाट्यांवरून नवीन वाद पेटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close