S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

शरद पवारांची 'राज' की बात, मनसेला लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुकीत रस?

मनसे लोकसभा नाही तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी अधिक आग्रही असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे 9 मार्च रोजी राज ठाकरे काय भूमिका घेतात? हे पाहावं लागणार आहे.

Updated On: Mar 7, 2019 02:13 PM IST

शरद पवारांची 'राज' की बात, मनसेला लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुकीत  रस?

मुंबई, सागर कुलकर्णी 7 मार्च : 'लोकसभा निवडणुकीबाबत मी 9 मार्च रोजी भूमिका जाहीर करेन' अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केली होती. पण, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे उतरणार नसल्याचं आता बोललं जात आहे. कारण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मनसेनं लोकसभेसाठी एकही जागा मागितली नसल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा मनसेला विधानसभेसाठी अधिक रस आहे. मनसेनं सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीमध्ये मनसे सामील होणार का? अशी चर्चा होती. पण, त्याबाबत अद्याप तरी काहीही स्पष्ट झालेलं नाही. शिवाय, काँग्रेसनं मनसेला सोबत घेण्यासाठी विरोध दर्शवला होता. पण, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र मनसेबाबत आग्रही होती.


हार्दिक पटेल पकडणार काँग्रेसचा 'हात'; या जागेवरून लढणार लोकसभा निवडणूकईशान्य मुंबईसाठी मनसे उत्सुक

लोकसभेसाठी मनसे ईशान्य मुंबई आणि कल्याणसाठी इच्छूक होती. तसा प्रस्ताव देखील मनसेनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. पण, आता मात्र मनसेनं लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण, यावर अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे 9 मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


अजित पवार - राज ठाकरे भेट

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दादरमधील कार्यकर्त्यांच्या घरी चर्चा केली होती. त्यामुळे मनसे आघाडीसोबत जाणार का? या चर्चेला अधिक उधाण आलं होतं. पण, मनसे लोकसभेसाठी इच्छुक नसल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे मनसे काय भूमिका घेणार? याकडे आला सर्वांचं अधिक लक्ष लागून राहिलं आहे.


VIDEO: 'गायब हो गया' ही या सरकारची नवी टॅगलाईन - राहुल गांधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close