Elec-widget

मनसेचा एकमेव आमदारही शिवसेनेच्या वाटेवर, मातोश्रीवर दाखल

मनसेचा एकमेव आमदारही शिवसेनेच्या वाटेवर, मातोश्रीवर दाखल

शरद सोनवणे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले असल्याची माहिती आहे.

  • Share this:

पुणे, 5 मार्च : मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे लवकरच पक्ष सोडतील, अशी शक्यता आहे. कारण शरद सोनवणे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले असल्याची माहिती आहे.

गेल्या काही काळात अनेक नेत्यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आणि मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे हेदेखील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आता निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते आणि शिवसेना नेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर चंद्रपुरातील शिवसेना आमदारही काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादी प्रवेश

अभिनेते अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे हे याआधी शिवसेनेत होते. त्यामुळे हा शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

Loading...

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असला तरी विलास लांडे यांनी मात्र त्यांना चक्क स्टार प्रचारक करून टाकलं आहे. त्यामुळे शिरूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका कोण असेल यावरून पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

आमदार बाळू धानोरकर काँग्रेसच्या वाटेवर

विदर्भात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण वरोरा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असंही बोललं जात आहे.

अभिनेते आणि शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता आमदार बाळू धानोरकर हेही लवकरच पक्षाला जय महाराष्ट्र करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात शिवसेनेला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.


VIDEO : पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची कपडे फाटेपर्यंत धुलाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...