साथ लढेंगे! EVM विरुद्धच्या मोर्च्यात राज ठाकरेंचं 'दीदीं'ना मुंबईत येण्याचं आवतन

या लढ्यात मी तुमच्यासोबतच आहे असं दीदींनी सांगितल्याचं राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 09:09 PM IST

साथ लढेंगे! EVM विरुद्धच्या मोर्च्यात राज ठाकरेंचं 'दीदीं'ना मुंबईत येण्याचं आवतन

कोलकाता 31 जुलै : मनसेचं प्रमुख राज ठाकरे यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि चर्चा केली. EVM विरुद्ध देशपातळीवर लढा उभारण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांना बळ मिळावं यासाठी त्यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. ममता दीदी या देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात मोठ्या राजकीय विरोधक समजल्या जातात. 9 ऑगस्टला मुंबईत EVMविरुद्ध सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज यांनी दीदींना निमंत्रित केलंय. या लढ्यात मी तुमच्यासोबतच आहे असं दीदींनी सांगितल्याचं राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

भर पावसात पेटली BEST ची बस, आगीत गाडीचा झाला कोळसा

आत्तापर्यंत राज ठाकरे महाराष्ट्र सोडून देशपातळीवर फारसे कधी गेले नव्हते. मात्र लोकसभेतल्या पराभवानंतर त्यांनी महाराष्ट्राबाहेरही आपला मोर्चा वळवला आहे. कधीकाळी मोदींचे कट्टर समर्थक असलेले राज ठाकरे हे आता कट्टर मोदी विरोधक म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन EVMविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर ते काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनाही भेटले.

महाराष्ट्रात मंदीची लाट, हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

राज हे कोलकात्यात तीन दिवस राहणार आहेत. यावेळी अमित ठाकरेही त्यांच्यासोबत होते. पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्या निमंत्रणावरून आपण कोलकात्यात आलो आहे. EVM आणि इतर राजकीय मुद्यांवर ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा झाल्याचंही राज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या मुद्यावर सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोगावर आपला विश्वास नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...

EVM ऐवजी बॅलेटपेपरने निवडणुका घ्याव्यात अशी राज यांची मागणी आहे. तर अशा निवडणुका घेता येणं आता शक्य नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. EVMनेच निवडणुका घेतल्या तर मनसे निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा विचार करत असल्याचंही सांगितलं जातेय. मात्र यासाठी इतर पक्ष तयार नाहीत.

IDBI बँकेच्या ATMवर दरोडा, तिजोरीत होती 28 लाखांची रक्कम

त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत मनसेचा समावेश होते काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी असाही मतप्रवाह राष्ट्रवादीत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मनसेने स्वतंत्रपणे लढविली तर भाजप आणि शिवसेनेला मिळणारी तरुणांची मतं खेचली जातील असा कयास बांधला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...