मनसेत दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना राज ठाकरेंचा 'दे धक्का !'

मनसेत दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना राज ठाकरेंचा 'दे धक्का !'

मनसेतल्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये बड्या नेत्यांच्या समर्थकांना घरचा रस्ता दाखवला जातोय. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या अनेक समर्थकांची उचलबांगडी करण्यात आलीय.

  • Share this:

 

मुंबई, 8 जुलै : पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी राज ठाकरेंनी आता नव्याने पक्षाची पुनर्बांधणी सुरू केलीय. मनसेतल्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये बड्या नेत्यांच्या समर्थकांना घरचा रस्ता दाखवला जातोय. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या अनेक समर्थकांची उचलबांगडी करण्यात आलीय. भायखळा, शिवडीतील नांदगावकरांनी यापूर्वी नियुक्त केलेले विभागाध्यक्ष बदलण्यात आलेत.

अंधेरीतही पक्षाचे उपाध्यक्ष संदीप दळवी यांना डच्चू देण्यात आलाय. पक्षाचे आणखी बडे नेते शिशिर शिंदे यांच्याकडेही राज ठाकरेंनी निष्क्रियतेबाबत खुलासा मागितलाय. विशेष म्हणजे पक्षाच्या या फेरबदलांमध्ये दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना कुठेही स्थान नाहीये. या सर्व नव्या नियुक्त्या राज ठाकरे स्वतः करताहेत. त्यामुळे मनसेतली जुनी संस्थाने खालसा होताना दिसताहेत.

दादरमध्येही संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांना बढती देण्यात आलीय. त्यामुळे नितीन सरदेसाईंचं पक्ष संघटनेतलं स्थान आपसूकच डळमळीत बनलंय. मनसेमधली मरगळ झकटून काढण्यासाठी स्वतः राज ठाकरेंनीच पक्षाची सूत्रं हाती घेतल्याने दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2017 01:33 PM IST

ताज्या बातम्या