पनवेल फेरीवाल्यांना मारहाण प्रकरणी मनसे कार्यकर्त्याला अटक

पनवेल फेरीवाल्यांना मारहाण प्रकरणी मनसे कार्यकर्त्याला अटक

या प्रकरणात मनसे कार्यकर्ते मिलींद खाडेंना अटक करण्यात आलीये.

  • Share this:

28 नोव्हेंबर : पनवेलजवळच्या कामोठेमध्ये काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण केली होती. या प्रकरणात मनसे कार्यकर्ते मिलींद खाडेंना अटक करण्यात आलीये.

पनवेल तालुक्यात कामोठे इथं मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येनं असणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी चोप देत हुसकावून लावलं होतं. मनसेचे नेते सुधीर नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं होतं. या प्रकरणी सोमवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज मनसे कार्यकर्ते मिलींद खाडेंना अटक करण्यात आलीये. आणखी काही कार्यकर्त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 12:30 PM IST

ताज्या बातम्या