विनायक मेटेंचा असाही स्टंट.. बीड विधानसभा मतदार संघात फोटोपरती 'मशागत'

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तिकिटावर बीड विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवणार, असे 'बाशिंग' बांधलेले शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटेंनी मतदार संघात आतापासूनच 'मशागत' सुरु केली आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 07:59 PM IST

विनायक मेटेंचा असाही स्टंट.. बीड विधानसभा मतदार संघात फोटोपरती 'मशागत'

बीड, 22 जुलै- आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तिकिटावर बीड विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवणार, असे 'बाशिंग' बांधलेले शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटेंनी मतदार संघात आतापासूनच 'मशागत' सुरु केली आहे. बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे सोमवारी चक्क कार्यकर्ता बैठक घेतल्यानंतर कापसाच्या शेतात औत हाकत मी पण तनकट काढून टाकू शकतो, असा सूचक संदेश देत आमदार मेटेंनी रूमण्यावर हात देत फोटोपुरता का होईना स्टंट केला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर मेटे त्यांच्या मतदारसंघातील तनकट ठरलेले कोणते नेते बाजूला सारणार तसेच ही मशागत किती फळ देणार, हे पाहणं गरजेचे ठरणार आहे.

निवडणूकजवळ आली की मतदार राजाला भुलवण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करताना कोण काय करेल सांगता येत नाही. पाच वर्षे न फिरकणारे नेते, बरेच हवेत फिरणारे नेते जमिनीवर येतात. विकासच्या गप्पा मरतात, आश्वासन देतात. असे बऱ्याचदा पाहायला मिळते. 2019 च्या विधानसभेचे ढगजवळ आल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदारकीची स्वप्न पडल्यागत अनेक नेते त्यांच्या मतदार संघात अंतर्गत मशागतीच्या कामाला लागल्याचे दिसत आहे. लग्न, साखरपुडा, मुंज ,वाढदिवस, पुण्यस्मरण, दशक्रियाविधीपासून बारशाच्या कार्यक्रमापर्यंत सर्वच कार्यक्रमाला आवर्जुन हजेरी लावत आहे. ते किती माणसाच्या संपर्कात आहे, हे दाखवून देत आहेत.

बीड विधानसभेत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे आमदार विनायक मेटे सध्या तयारीला लागले आहेत. यासाठी मतदार संघात तळ ठोकून आहेत. आमदार मेटेंनी औत हाणत शेती पिकांचीही आंतर मशागत केली. यावेळी कार्यकर्त्यांची फोटो काढताना शर्यत लागली होती. मात्र, विनायक मेटे हे गाव खेड्यातले आणि शेती-मातीतून चळवळीच्या माध्यमातून पुढे आले आहेत. आजही मातीशी नाळ कायम आहे, हे दाखवून देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हाय होल्ट स्टंटबाजी केली.

VIDEO : राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्याचा थेट सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 07:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...