नवनीत कौर यांचं जात प्रमाणपत्र रद्द

नवनीत कौर यांचं जात प्रमाणपत्र रद्द

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना बनावट जात प्रमाणपत्र सादर केलं होतं.

  • Share this:

प्रफुल्ल सांळुखे, मुंबई

05 जुलै : आमदार रवी राणा यांची पत्नी नवनीत कौर यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय.  लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना बनावट जात प्रमाणपत्र सादर केलं होतं.

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी जयंत वंजारील आणि राजू मानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि रियाज छागला यांच्या बेंचने याबद्दल आज निकाल दिलाय.

जात वैधता करताना वडिलांचं बांद्रा मधील कागदपत्र बनावट असल्याचं समोर आलं होतं. जी शाळा अस्तित्वातच नाही तिचा शाळा सोडल्याचा दाखला कसा दिला जातो? या आधारावर जात प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

आता नवनीत कौर यांनी पंजाबच्या रहिवासी असल्याचं प्रमानपत्र दिलं आहे. त्याबाबतही चौकशी करून तीन महिन्यात अहवाल देऊन निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने जात वैधता समितीला दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 05:46 PM IST

ताज्या बातम्या