अभियंता शिवीगाळप्रकरणी नितेश राणेंसह 18 जणांना अटक, सहा जणांवर गुन्हा दाखल

अभियंता शिवीगाळप्रकरणी नितेश राणेंसह 18 जणांना अटक, सहा जणांवर गुन्हा दाखल

मुंबई-गोवा महामार्गावर अभियंता प्रकाश शेडेकर यांना शिविगाळ करणे, तसेच त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याप्रकरणी कणकवलीचे कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

दिनेश केळुसकर, (प्रतिनिधी)

कणकवली, 04 जुलै- मुंबई-गोवा महामार्गावर महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करणे, तसेच त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याप्रकरणी कणकवलीचे कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह पोलिसांनी 18 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींविरूद्ध भादंवि कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्येही आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांसोबत अरेरावी केली. दुसरीकडे, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

आमदारांसह 18 जणांना अटक..

महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक, पुलाला बांधून कामात अटकाव व धक्काबुक्की, सरकारी नोकरास मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री, गटनेते संजय कामतेकर, शहराध्यक्ष राकेश राणे, संदीप नलावडे, निखील आचरेकर, राजन परब, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगांवकर, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, बबन हळदिवे, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, माजी नगरसेवक किशोर राणे, शामसुंदर देसाई, सचिन पारधिये, विठ्ठल देसाई, अभिजित मुसळे या अठरा संशयीत आरोपींचा समावेश आहे.

कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई–गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी आंदोलन करत महामार्ग प्राधिकरण उपअभियंत्याला यांना शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्यांच्या अंगावर चिखल फेकला. नंतर अभियंता शेडेकर यांना खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कनकवली पोलिसांनी आमदार राणे यांना अटक केली आहे.

नितेश राणेंनी विचारला जाब...

महामार्गाच्या कामावर नाराजी व्यक्त करत आमदार राणे आक्रमक झाले सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असा सवाल अभियंता प्रकाश शेडेकर यांना केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल फेकला. त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी नितेश राणे 15 दिवसांत समस्या सोडवा, अशी तंबी देखील अभियंत्याला दिली.

चुकीला माफी नाही! मुलाच्या चिखलफेकीवर वडिलांनी मागितली माफी..

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर आमदार नितेश राणे आक्रमक झाले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल फेकला. शिवीगाळ केली. या घटनेमुळे नितेश राणेंवर चौफेर टीका होत असताना नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफी मागितली आहे. तसंच 'नितेशने केलेले कृत्य चुकीचे होते. मी त्याचे समर्थन करत नाही',असेही राणे यांनी म्हटले आहे.

'मुलाला मागावी लागेल माफी'

मीडियासोबत संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की,'हायवेवरील समस्यांसंदर्भात आंदोलन करणे ठीक आहे. पण नितेश आणि कार्यकर्त्यांनी अभियंत्यासोबत केलेला व्यवहार चुकीचा होता. मी त्याचे समर्थन करत नाही. या कृत्याबाबत मी नितेशला माफी मागण्यास सांगेन.

नितेश राणेंचा राडा; अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2019 09:25 PM IST

ताज्या बातम्या