...म्हणून 6 आमदारांना 15 दिवसांत द्यावा लागणार राजीनामा

लोकसभा निवडणुकीत 11 आमदार जनमताचा कौल आजमवत होते. पण, 11 पैकी सहा आमदार राज्यातून संसदेत जाणार आहेत. येत्या 15 दिवसांत सहा आमदारांना आता राजीनामा द्यावा लागणार आहे.

  • Share this:

पुण्यातील भाजप आमदार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या आमदरकीचा राजीनामा हा 15 दिवसांत द्यावा लागणार आहे.

MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा औरंगाबादमधून पराभव केला. त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवली होती.

आमदार सुरेश धानोरकर देखील लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. शिवसेनेचे आमदार असलेल्या सुरेश धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.

प्रतापराव पाटील - चिखलीकर यांनी काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील – चिखलीकर शिवसेनेकडून विजयी झाले होते.पण, नांदेड पालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अखेर भाजपनं त्यांना नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्याविरोधात उमेदवारी दिली.

शिवसेनेचे हिंगोलीत उमेदवार आमदार हेमंत पाटील यांनी काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना देखील आपल्या उमेदवारीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. तर, संग्रम जगताप, भाऊसाहेब कांबळे, सुभाष झांबड के. सी. पाडवी, कुणाल पाटील यांना मात्र लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 12:20 PM IST

ताज्या बातम्या