S M L

रावसाहेब दानवे चंबलच्या डाकूपेक्षाही मोठे गुंड, शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्याला पाडा- बच्चू कडू

शेतकऱ्यांना साले म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी आम्ही काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत असल्याची माहिती प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Updated On: Apr 21, 2019 01:43 PM IST

रावसाहेब दानवे चंबलच्या डाकूपेक्षाही मोठे गुंड, शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्याला पाडा- बच्चू कडू

जालना, 21 एप्रिल- शेतकऱ्यांना साले म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी आम्ही काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत असल्याची माहिती प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, दानवेना चंबलचे डाकूपेक्षा भारी म्हणत गुंडाराज, वाळू माफिया, राज्यातील सर्वात कमी ऊसदर याविविध मुद्द्यांवरून बच्चू कडू यांनी दानवेंवर हल्लाबोल केला.

दानवेंना पाडण्याचा उचलला विडा..


बदला घेण्यासाठी भाजपला नव्हे तर दानवेंना पाडण्याचा विडा उचलला असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली. ते म्हणाले, मी कॉंग्रेसच्या बाजूने कधीच नव्हतो आणि दानवे यांना पाडण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. विलास औताडे यांच्या एका पैशाचा गुलाम नाही. पण, शेतकऱ्याला साल्या म्हणणाऱ्या दानवेंच्या विरोधात आपली सटकली आहे.

सिपोरा बाजार येथील दानवे यांच्या साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून १६०० रुपये टनाने ऊस खरेदी केला जातो. दुसरे कारखाने एकवीसशे रूपये दर देतात, ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 01:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close