पुण्यातून 9 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला तरुण झाला माओवाद्यांचा कमांडर

पुण्यातून 9 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला तरुण झाला माओवाद्यांचा कमांडर

'पुण्यातल्या कासेवाडी झोपडपट्टीत राहाणारा संतोष हा कबीर कला मंचमध्ये काम करत होता त्यानंतर तो माओवादी बनला.'

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे 9 जुलै : पुण्यातून 9 वर्षांपुर्वी  बेपत्ता झालेला तरुण छत्तीसगडमध्ये माओवादी संघटनेत सहभागी झाला. तो आता माओवादी कमांडर झाला असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. छत्तीसगड पोलिसांनी नुकतीच माओवाद्यांची एक यादी जाहीर केली त्यात हे धक्कादायक वास्तव उघड झालं. संतोष शेलार असं त्या तरुणाचं नाव आहे. राजनंदगाव येथील तांडा एरिया कमीटीचा संतोष हा डेप्युटी कमांडर असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. संतोष हा 2010 पासून बेपत्ता असल्याची नोंद खडक पोलिसांकडे आहे.

पुण्यातल्या कासेवाडी झोपडपट्टीत राहाणारा संतोष हा कबीर कला मंचमध्ये काम करत होता. हे काम सुरू असतानाच तो अँजला सोनटक्के आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्या संपर्कात आला. त्यानंतर तो माओवादाकडे आकर्षीत झाला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र ATS ने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये तो अजुनही फरार असल्याचं नमुद करण्यात आलंय.

पावसामुळं सामना थांबला, भारताला मिळू शकते इतक्या धावांचे आव्हान

कोण आहे संतोष शेलार?

संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा असे त्याचं नाव आहे. तो पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी इथं राहत होता. नोव्हेंबर 2010मध्ये तो पुण्यातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा बराच शोध घेतला गेला. मात्र त्याचा काहीही पत्ता लगाला नाही. अखेर 2011मध्ये तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

हे काम केलं नाही तर 20 कोटी लोकांची पॅन कार्ड होणार रद्द

संतोष शेलार हा नक्षलवाद्यांच्या सशस्त्र पथकांमध्ये सहभागी झाल्याची माहिती 2014मध्ये गडचिरोली पोलिसांनी दिली होती. त्यानंतर तो माओवाद्यांचा उप कमांडर झाल्याचा धक्कादायक खुलासा छत्तीसगड पोलिसांनी केलाय. माओवाद्यांशी संबंधित जाहीर केलेल्या यादीमध्ये विश्व या नावाने शेलार यांचा मिलीटरी कमांडर च्या वेषातला फोटोही देण्यात आलाय. पण पुण्यात त्याच्या कुटुंबीयांना अजून ही संतोष नक्षलवादी असल्याचं मान्य नाही असं त्याचा भाऊ सचिन शेलार याने म्हटलं आहे. कबीर कला मंचने संतोषची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती असंही त्याच्या कुटुबीयांना वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2019 08:52 PM IST

ताज्या बातम्या