विजय देसाई,मुंबई, 16 एप्रिल : मिराभाईंदर येथील इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात प्रसूत झालेल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आहारात किडे आढळून आल्याचा किळसवाणा प्रकार घडलाय.
मिराभाईंदर येथील इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात हा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली. आहारात किडे आढळून आल्याने माता संगोपनासाठी शासनाने केल्या जाणाऱ्या करोडो रुपये पाण्यात जात असून शासनाच्या धोरणाला हरताळ फासला आहे. याबाबत पालिकेने ठेकेदारावर बोट ठेवत आपली बाजू सांभाळली पण कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला.
प्रसुतीसाठी या रुग्णालयात दाखल झालेल्या निशा हाडमोडे यांच्या आहारात हे किडे आढळून आले. त्यांनी इतर रुग्णाच्या ताटात पाहिले असता तसाच प्रकार होता.
या संदर्भात पालिका आणि तत्सम रुग्णालय प्रशासनाला विचारले असता त्यांनी या बाबत काहीही बोलण्यास नकार दिला आणि ठेकेदारावर बोट ठेवले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा