S M L

सुधारगृहातून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Samruddha Bhambure | Updated On: Apr 24, 2017 02:29 PM IST

सुधारगृहातून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

 

24 एप्रिल :  नागपूरच्या आमदार निवासात तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना उपराजधानी पुन्हा एकदा अशाच एका घटनेनं हादरलीय. एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केलाय.

गेल्या आठवड्यात नागपूर इथल्या महिला सुधारगृहातून चार अल्पवयीन मुली पळाल्या होत्या. त्या चार मुलींपैकी एक मुलगी एका ऑटो चालकाच्या संपर्कात आली. त्याने तिला मदत करण्याचं आमिष दाखवून सुगत नगरमध्ये नेलं. यावेळी आपल्या मित्रांच्या मदतीने त्यानं या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला रस्त्यावर सोडून सगळे पसार झाले.नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी आत्तापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. तर पीडित मुलीची रवानगी सुधारगृहात करण्यात आलीय.

दरम्यान, गेल्या आठवड्यात, आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर भंडाऱ्यातही सामूहिक बलात्काराची घटना घटली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 10:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close