रत्नागिरी अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाला धक्कादायक वळण

रत्नागिरी अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाला धक्कादायक वळण

पीडित मुलीची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. आरोपीने 100 रुपयांचे आमिष देऊन या पीडित मुलीवर अत्याचार केले.

  • Share this:

दिनेश केळुसकर, प्रतिनिधी

रत्नागिरी,13 डिसेंबर : जिल्ह्यातील खंडाळा गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून नवी माहिती समोर आली आहे.

कांबळेलावगण रोड, वाटद खंडाळा गावात राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी ही गतिमंद असल्याचं समोर आलं आहे. तिच्यावर 18 सप्टेंबरपासून 4 ते 5 वेळा अत्याचार करण्यात आले.  या पीडित मुलीची घरची परिस्थितीत हालाखीची आहे.

पीडित मुलीचा भाऊ हा एका हाॅटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. तर आईही धुणीभांडीचे काम करते. तर वडील मिळेल त्या ठिकाणी मजुरीचे काम करता.लहान भाऊ हा शाळेत शिकतोय.

पीडित मुलगी गतिमंद असल्यामुळे ती शाळेत पूर्ण शिक्षण घेऊ शकली नाही. आठवीपर्यंत तिनं कसंबसं शिक्षण घेतलं त्यानंतर ती अधून मधून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारीची मदत करत होती.

याच गावात राहणारा आरोपी विनोद वाकोडे या तरुणाने पीडित मुलीला 100 रुपयांचं आमिष देऊन गाडीवर घेऊन गेला आणि गावातील हाॅलीबाॅल मैदानाजवळ अत्याचार केला. त्यानंतर या आरोपीनं पीडित मुलीला आणखी पैसे देतो म्हणून घरी काही न सांगण्यास दम दिला. ही घटना सप्टेंबर महिन्यात घडली. त्यानंतर या आरोपीने या पीडित मुलीवर चार ते पाच वेळा अत्याचार केला.

दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीला अचानक उलट्या होऊ लागल्या. आईने जेव्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेलं असता ती गर्भवती असल्याचं समोर आलं. आपली गतिमंद मुलगी गर्भवती असल्याचं ऐकून त्यांना धक्का बसला. त्यांनी आपल्या मुलीला विश्वासात घेतलं असता तिनं घडलेली सर्व हकीकत सांगितली.

या घटनेनंतर पीडित मुलीची आई आणि भावानं जयगड पोलीस ठाणे गाठलं. पीडित मुलीच्या भावानं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून विनोद वाकोडे या आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

मात्र पीडित मुलीवरवर वारंवार होणाऱ्या बलात्कार प्रकरणात आणखी आरोपी असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.या सर्वांना शोधून तातडीनं अटक करावी अशी मागणी खंडाळा गावातल्या कुणबी समाजानं केली आहे.


============================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2018 02:56 PM IST

ताज्या बातम्या