TikTok वर व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात शिर्डीत युवकावर झाडली गोळी

TikTok वर व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात शिर्डीत युवकावर झाडली गोळी

शिवाजी नगर भागातील हॉटेल पवनधाम येथे एका युवकाची बुधवारी गोळी झाडून हत्या करण्यात आलीय. हॉटेलच्या रुम क्रमांक 104 मध्ये हा थरार घडला आहे. या गोळीबारात प्रतिक वाडेकर या 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय.

  • Share this:

शिर्डी, 12 जून- शिवाजी नगर भागातील हॉटेल पवनधाम येथे एका युवकाची बुधवारी गोळी झाडून हत्या करण्यात आलीय. हॉटेलच्या रुम क्रमांक 104 मध्ये हा थरार घडला आहे. या गोळीबारात प्रतिक वाडेकर या 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. प्रतिकच्या गळ्यावर गावठी पिस्तूलमधून गोळी झाडण्यात आली असून आरोपी नात्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

TikTokवर व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात झाडली गोळी...

TikTok वर व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्ना गावठी कट्ट्यातून ही गोळी झाडली गेली. गोळी थेट प्रतिकच्या छातीत घुसल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे. दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

घटनेतील मृत प्रतिक वाडेकर त्याचा चुलत भाऊ नितीन वाडेकर यांचेसह पाच जणांनी फ्रेश होण्यासाठी रुम भाड्याने घेतली होती. मृत प्रतिक वाडेकर (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) हा बाहेरगावी शिक्षणासाठी होता. चुलत्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तो शिर्डीत आला होता. रुम भाड्याने घेतल्यानंतर पाच जण रुम मध्ये गेले. त्यानंतर रुममध्ये गावठी पिस्तुलातून गोळी झाडत प्रतिकची हत्या करण्यात आली. घटनेनंतर चौघेही हॉटेलच्या रुममधून फरार झाले. हॉटेल मालकाने रुममध्ये जखमी अवस्थेत बघितल्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहीती दिली. दरम्यान विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनेच गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी सनी पोपट पवार या आरोपीस ताब्यात घेतले असून अन्य तिघे फरार आहेत.

हत्येचं निश्चित कारण समजू शकले नसले तरी चेष्टा मस्करीत प्रतिकची हत्या झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ तीन पोलिस पथके रवाना केली आहेत. शिर्डी सारख्या धार्मिक तिर्थस्थळी देशी कट्टे येतात कसे ? हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत असुन शिर्डीत गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत आहे. राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच शिर्डी येथे भेट दिली होती. ही झिरो क्राईम सिटी करण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र त्यांचा हा मानस पूर्ण होईल का नाही, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.


SPECIAL REPORT : इम्रान खान यांच्यावर का आली मोदींसारखं पाऊल उचलण्याची वेळ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2019 01:10 AM IST

ताज्या बातम्या