औरंगाबाद,16 ऑक्टोबर: गुंडांनाही लाजवेल असा राडा आज एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबाद महापालिकेत केला आहे. औरंगाबाद महापालिकेत आज पाणीप्रश्नावरून हा गदारोळ करण्यात आला.
औरंगाबाद महापालिकेच्या महासभेत आज एमआयएमनं पाणी प्रश्न उपस्थित केला. सभागृहात चर्चा करण्याऐवजी एमआयएम नगरसेवक राजदंड पळवण्यासाठी धावले. नगरसेवकांना रोखणाऱ्या सुरक्षा रक्षकांना या नगरसेवकांनी खाली पाडलं. हे कमी की काय नगरसेवकाने सुरक्षा रक्षकांच्या अंगावर खूर्ची फेकली. महापौरांचा पट्टेवाला यातून थोडक्यात बचावला. खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकांना केलेल्या कृत्याचा ना खेद आहे ना खंत आहे.
एमआयएमनं महापालिका सभागृहाचं पावित्र्य भंग तर केलंच शिवाय गुंडगिरीचं दर्शन घडवलं. आपण कुणाला महापालिकेत निवडून पाठवलंय याचा औरंगाबादकरांना निश्चित पश्चाताप झाला असेल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा