S M L

धीर धरा, दुधाच्या प्रश्नावर दोन दिवसात तोडगा निघणार – गडकरी

दुधाच्या प्रश्नावर येत्या दोन दिवसांमध्ये तोडगा काढू असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2018 10:28 PM IST

धीर धरा, दुधाच्या प्रश्नावर दोन दिवसात तोडगा निघणार – गडकरी

नवी दिल्ली,ता.17 जुलै : दुधाच्या प्रश्नावर येत्या दोन दिवसांमध्ये तोडगा काढू असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिलीय.  केंद्राच्या या निर्णयामुळं दूध आंदोलनाची हवा निघाली असल्याचं पाशा पटेलांनी सांगितलंय. तर  नितीन गडकरी यांनी दूध आंदोलकांना धीर धरण्याचा सल्ला दिलाय. आंदोलकांनी मागणी केल्याप्रमाणं 5 रूपये देण्याची तयारी केंद्राने दाखवली आहे. तीन रूपये तातडीनं आणि नंतर टपप्याटप्प्याने दोन रूपये दूध महासंघामार्फेत देण्यात येतील असं पाशा पटेल यांनी सांगितलं मात्र ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं आंदोलकांचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा...

थोरात, सातव आणि रजनी पाटील महाराष्ट्रातून काँग्रेस कार्यकारिणीवर


औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांना ओलांडावा लागतो ‘मृत्यू’चा ट्रॅक

सिंचन घोटाळ्याप्रकरणी आणखीन दोघांवर गुन्हे दाखल!

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणांचं नाव 

Loading...

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 10:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close