दूध प्रश्नावर तोडगा नाही, आंदोलन सुरूच राहणार

दुधाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नागपूरात झालेली महत्वाची बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे दूध बंद आंदोलन सुरूच राहणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2018 07:07 PM IST

दूध प्रश्नावर तोडगा नाही, आंदोलन सुरूच राहणार

नागपूर,ता.17 जुलै :  दुधाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नागपूरात झालेली महत्वाची बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे दूध बंद आंदोलन सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात ही बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. मात्र 5 रूपये भाव देण्यास सरकारने असमर्थता दर्शवली. आता याच प्रश्नावर दोन दिवसांनी पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. त्या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होणार आहे.

सरकारने दूधाला 5 रूपये वाढवून द्यावे आणि दूधावर आयातशुल्क लावावं अशी मागणी विरोधपक्षांनी केली होती. 5 रूपये देणं सध्याच शक्य नाही. सरकार तीन रूपये वाढवून द्यायला तयार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. आयातशुल्काचा विषय हा राज्य सरकारच्या नाही तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची तयारीही सरकारनं दाखवली. मात्र सरकारच्या भूमिकेवर विरोधकांचं समाधान झालं नाही. दूध बंदचा आजचा दुसरा दिवस आहे. आंदोलन चिघळलं तर पुणे आणि मुंबईत दूधाचा तुटवडा होऊ निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा...

VIDEO : संभाजी भिडेंचा आंबेडकरांबद्दलचा दावा हरी नरकेंनी खोडला

VIDEO: गर्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले

संभाजी भिडेंविरोधात नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

अखेर अतुल भातखळकर यांनी मागितली माफी!

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close