दूध बंद आंदोलन 'उकळलं', आज राज्यभरात चक्काजाम

दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राजू शेट्टी आणि गिरीष महाजन यांच्यात रात्री उशीरा बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2018 08:00 AM IST

दूध बंद आंदोलन 'उकळलं', आज राज्यभरात चक्काजाम

मुंबई, 19 जुलै : दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राजू शेट्टी आणि गिरीष महाजन यांच्यात रात्री उशीरा बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. जोपर्यंत सरकार ठोस भूमिका घेऊन तोडगा काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं या बैठकीनंतर राजू शट्टी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आज चौथ्या दिवशी देखील दूध कोंडी कायम आहे.

दरम्यान आज संध्याकाळी दूधसंघाच्या संचालकांबरोबर मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. यावेळी चर्चेतून आंदोलनावर मार्ग काढू असं आश्वासन गिरीष महाजन यांनी दिलंय. दरम्यान, राजू शेट्टींनी आज राज्यभरात चक्काजामची हाक दिलीये. त्याचे काय आणि किती पडसाद उमटतात, ते आता पहावं लागेल.

तुमच्या पगारात होणार कपात,सॅलेरी स्लिपही बदलणार ?

राज्यातील दूध पट्ट्यात या आंदोलनाचे तीव्र पडसाद मागील तीन दिवस उमटत आहेत. दोन दिवसापासून गुजरात सीमेवर राजू शेट्टी स्वत: ठान मांडून आहेत. तर शिरोळ्यात काल आंदोलनकांनी दूधाचा टँकर पेटवण्यात आला. सांगलीत दूध टँकरसह दोन बसही फोडण्यात आल्या.  तर तिकडे कर्नाटकातून येणाऱ्या दूधाला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.

मुंबईत येणाऱ्या दूधाच्या टँकरला आंदोलकांनी मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर लक्ष्य करण्यात आलं. बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यात आला. तर पंढरपुरात दूध केंद्राची तोडफोड करण्यात आली. सर्वत्र हिंसक वळण मिळत असताना नगरमध्ये मात्र आंदोलकांनी मोफक दूध वाटप केलं. दरम्यान दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्ये नागपुरात बैठक होणार आहे.

हेही वाचा...

दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?

...तर तुमच्या पैशातून निवडणुका घ्या,खडसेंचा पक्षाला घरचा आहेर

PHOTOS: 30 वर्षांपूर्वी केला होता क्रूर गुन्हा,कंडोममुळे झाली अटक !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 07:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close