विधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन

मुख्यमंत्री दालनात विरोधी पक्ष नेते, राजू शेट्टी समवेत चर्चा करू, जो योग्य असेल तो योग्य निर्णय घेणार असं दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2018 12:18 PM IST

विधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन

मुंबई, 17 जुलै : मुख्यमंत्री दालनात विरोधी पक्ष नेते, राजू शेट्टी समवेत चर्चा करू, जो योग्य असेल तो योग्य निर्णय घेणार असं दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. दूध भुकटी अनुदान ५० रूपयांपेक्षा जास्त देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेऊ असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, कालपासून सुरू असलेल्या दुधकोंडीमुळे विरोधकांनी विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे सभागृह 15 मिनिटं तहकूब करण्यात आले होते. दूध भुकटी अनुदान जास्त द्यावी अशी मागणी करत घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

कहर! फोन काढण्यासाठी टॉयलेटच्या भांड्यात घातला हात, 5 तासांसाठी अडकला

अनेक ठिकाणी दुधासाठी अमुलसारखा एकच ब्रॅन्ड आहे, पण आपल्या राज्यांत तस नाही. त्यामुळे राज्यात दुधासाठी एक ब्रॅन्ड करणार अशी भूमिका येथील दूध संघ यांनी घेतली आहे. खाजगी दूध कंपन्या काही पाकिस्तानातील नाही. त्याही आपल्याच शेतकरी वर्गाकडून दूध घेणाऱ्या आहेत. असंही जानकर म्हणाले.

दूध व्यवसायत काही चांगल्या सूचना असतील तर आवश्य करू. सहकारी संघ व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर सहकारी संघ कोर्टात गेले. राजू शेट्टी समवेत तीन वेळा फोनवर बोललो. मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि इतर नेते चर्चेला बोलवावयास तयार आहे त्यामुळे त्यांनी 2 दिवसांत चर्चा करण्यासाठी यावे असं जानकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता यावर राजू शेट्टी काय निर्णय घेतात याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.

हेही वाचा...

Loading...

गोरक्षेच्या नावाने हिंसा करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

VIDEO : खड्ड्यांसाठी मुंबईकरांना मिळतेय 'तारीख पे तारीख'

VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...