मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

मिलिंद एकबोटेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय. हा गंभीर गुन्हा आहे अशी टिप्पणीही न्यायालयाने नोंद केलीये.

Sachin Salve | Updated On: Jan 22, 2018 06:11 PM IST

मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

22 जानेवारी : कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी समस्त हिंदु आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटेंना पुणे न्यायालयाने दणका दिलाय. मिलिंद एकबोटेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय. हा गंभीर गुन्हा आहे अशी टिप्पणीही न्यायालयाने नोंद केलीये.

1जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं शौर्य दिनाच्या दिवशी आंबेडकरी अनुयायी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. याच अनुयायांवर सणसवाडीजवळ एका गटाकडून हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती. तसंच या हिंसक जमावाने काहींची घरं देखील पेटवून दिली होती.

कोरेगाव भीमा परिसरात आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करणाऱ्या या हिंसक जमावल्याचा चिथावणी दिल्याचा आरोप मिलिंद एकबोटे यांच्यावर ठेवण्यात आलाय. संभाजी भिडे यांच्यावरही याच गुन्ह्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झालाय. अटक टाळण्यासाठी मिलिंद एकबोटेंनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आज न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावलाय. कोरेगाव भीमा दंगल प्रकरण हा गंभीर गुन्हा आहे अशी टिप्पणी करत अप्पर सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना अटक अटळ आहे.

कोण आहेत मिलिंद एकबोटे ?

मिलिंद एकबोटे हे पुण्यातील हिंदुत्ववाद्यांसाठी युवकांची आक्रमक संघटना चालवतात. समस्त हिंदु आघाडी असं त्यांच्या संघटनेचं नाव आहे. दादोजी कोंडदेव पुतळा हटवतानाही त्यांनी तीव्र विरोध केला होता. तसंच प्रतापगडावरील अफजल खानाची समाधी हटवण्यासाठीही त्यांनी आंदोलन केलं होतं. पुणे महापालिकेच्या राजकारणातही ते यापूर्वी सक्रिय होते. आता त्यांची वहिनी मनपाचे इलेक्शन लढवते. पुण्यात हिंदुत्ववादी विरूद्ध पुरोगामी असा वाद उभारल्यास मिलिंद एकबोटे हे नेहमीच हिंदुत्ववाद्यांच्या बाजुने मैदानात उतरताना दिसतात. गेल्या महिन्यात शनिवार वाड्यावर डाव्या संघटनांनी भरवलेल्या एल्गार परिषदेला मिलिंद एकबोटेंनी कडाडून विरोध केला होता. याच वादातून वढू ब्रुद्रूकमध्ये गोविंद महार समाधीच्या पोस्टरचा वाद उकरून दंगल घडवली गेल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी मिलिंद एकबोटेंवर केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2018 06:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close