S M L

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना तीन दिवसांपूर्वी कोर्टात हजर करण्यात आलं . तेव्हा त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली एकबोटेंना न्यायालय आवारात काळे फासण्याचा प्रयत्न झाला होता

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 21, 2018 06:03 PM IST

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

21 मार्च: कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी अटक झालेले हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांना पुण्यातील सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.याआधी 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आली होती.

या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना तीन दिवसांपूर्वी कोर्टात हजर करण्यात आलं . तेव्हा त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली एकबोटेंना न्यायालय आवारात काळे फासण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर एकबोटे यांच्या समर्थकांनी काही काळ न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला. तसंच काही जणांनी मिलिंद एकबोटेंवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता.

१ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा या ठिकाणी दोन गटांमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप होतो आहे. तसंच या दोघांविरोधात दंगली भडकवण्याचे,अॅट्रोसिटीचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकबोटेंना अटक झाली आहे तर भिडेंच्या अटकेची मागणी जोर धरते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2018 06:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close