S M L

कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटकपूर्व जामीन मंजूर

सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर लगेच अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आपल्याला जामीन मिळावा म्हणून मिलिंद एकबोटेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 7, 2018 04:49 PM IST

कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटकपूर्व जामीन मंजूर

 07 फेब्रुवारी: कोरेगाव भीमा प्रकरणी प्रमुख आरोपी  मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांना दिलासा मिळाला आहे.

1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा येथे  जातीय दंगली झाल्या होत्या.यामध्ये एक जण ठार झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. याप्रकरणी दंगली भडकवल्याचा ठपका संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांच्यावर लगेच अॅट्रोसिटीचा  गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आपल्याला जामीन मिळावा म्हणून मिलिंद एकबोटेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. काल संध्याकाळी हायकोर्टाने एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळला होत. या निर्णयाविरूद्ध  त्यांनी सर्वोेच्च न्यायालयात आज धाव घेतली असून आज त्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान याप्रकरणी अजूनही पोलीस तपास सुरू  आहे. आंबेडकरवादी विचारांच्या संघटनांकडून मिलिंद एकबोटेंच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात एकबोटेवरचे आरोप सिद्ध होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2018 04:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close