News18 Lokmat

मिलिंद एकबोटेंना अखेर जामीन मंजूर

भीमा कोरेगाव दंगल प्रकरण आणि पोलीस कर्मचारी जखमी प्रकरणात मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर झाला आहे. संध्याकाळपर्यंत एकबोटे कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2018 11:02 AM IST

मिलिंद एकबोटेंना अखेर जामीन मंजूर

19 एप्रिल: भीमा कोरेगाव दंगल प्रकरण  आणि   पोलीस कर्मचारी जखमी प्रकरणात मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर  झाला आहे. संध्याकाळपर्यंत एकबोटे कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे.

1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगावला दोन गटांमध्ये दंगल झाली होती. या  दंगल प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात मिलिंद एकबोटे यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये पहिला गुन्हा हा अॅट्रोसिटी आणि दंगल भडकवल्याप्रकरणी होता तर दुसरा गुन्हा हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना झालेल्या दुखपतीबद्दल होता.

यापैकी अॅट्रोसिटी आणि दंगल भडकवण्याच्या गुन्ह्यात एकबोटे यांना 4 एप्रिल रोजी जामीन मंजूर झाला होता. मात्र त्या दिवशी शिक्रापूर पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात एकबोटे यांना अटक केली. शिक्रापूर न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.  ही कोठडी संपल्यानंतर केलेल्या जमीन अर्जाचा युक्तिवाद आज संपल्यानंतर न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांना 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केलाय. पहिल्या गुन्ह्यात ही जामीन मंजूर झाला असल्याने मिलिंद एकबोटे यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2018 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...