आदित्य, हे नाटक थांबवा आणि सत्तेतून बाहेर पडा, मिलिंद देवरांचा टोला

आदित्य, हे नाटक थांबवा आणि सत्तेतून बाहेर पडा, मिलिंद देवरांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर आश्वासनं पूर्ण करू शकत नसतील तर टीका करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा असा टोला काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

  • Share this:

मुंबई,ता. 21 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर आश्वासनं पूर्ण करू शकत नसतील तर टीका करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा असा टोला काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. पेट्रोलच्या दरवाढीवरून आदित्य ठाकरेंनी आज ट्विट करून केंद्र सरकारवर टीका केली.

मुंबईत पेट्रोलचे भाव आकाशाला भिडले आहेत, 2014 मध्ये दिलेलं आश्वासन सरकार विसरलं आहे. "बहुत हुई महंगाई की मार.. अब की बार.. नहीं करेंगे गलती बार बार" असं ट्विट युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी केलं होतं त्याला मिलिंद देवारांनी ट्विटरवर उत्तर दिलंय.

आदित्य, तुम्ही गेली चार वर्ष सत्तेत आहात, पंतप्रधान जर आश्वासनं पूर्ण करत नसतील तर सत्तेतून बाहेर पडा. वारंवार टीका करण्याचं नाटक आता बंद करा असा टोला देवरांनी लगावला आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2018 12:44 PM IST

ताज्या बातम्या