S M L

किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

आजचा हा भूकंपाचा धक्का इतर धक्क्यांपेक्षा मोठा असल्यानं किल्लारी परिसरातील नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2017 04:20 PM IST

किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

31 आॅक्टोबर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या किल्लारीसह आसपासच्या आठ ते दहा गावात आज दुपारी बारा वाजून 23 मिनिटाला भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय.

किल्लारी परिसरात अधून मधून भूकंपाचे धक्के नेहमीच बसतात. मात्र आजचा हा भूकंपाचा धक्का इतर धक्क्यांपेक्षा मोठा असल्यानं किल्लारी परिसरातील नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

अचानक भूकंप झाल्यानं गावातील सर्व लोक घराबाहेर पडले आहेत. १९९३ साली महाप्रलयकारी भुकंपानं किल्लारी सह आसपासची दहा गावं उध्द्वस्त झाली होती. त्यामुळे आजही या भागात भूकंपाची दहशत नागरिकांमध्ये आहे. आजचा भूकंप हा ३.० रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याची नोंद भूकंप मापन केंद्रात करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 04:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close