MHT CET Result 2019 : मुंबईची किमया आणि अमरावतीचा सिद्धेश अव्वल

MHT CET Result 2019 : मुंबईची किमया आणि अमरावतीचा सिद्धेश अव्वल mhtcet2019.mahaonline.gov.in

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 02:21 PM IST

MHT CET Result 2019 : मुंबईची किमया आणि अमरावतीचा सिद्धेश अव्वल

मुंबई, 04 जून : MHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून परीक्षेत मुंबईच्या किमया शिकारखाने आणि अमरावतीच्या सिद्धेश अग्रवालनं अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. किमया आणि सिद्धेशनं 99.98 टक्के गुण मिळवले आहेत. सोमवार मध्यरात्रीपासून निकाल वेबसाईटवर उपलब्ध आहे. https://mhtcet2019.mahaonline.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. https://mhtcet2019.mahaonline.gov.in या वेबसाईटला उपलब्ध भेट दिल्यानंतर मंगळवारी दिवसभर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

4 लाख विद्यार्थी बसले होते परीक्षेला

राज्यात 36 जिल्ह्यांमध्ये 166 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा घेण्यात आली होती. 10 दिवस 19 सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. MHT-CETच्या परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, 20 हजार 930 विद्यार्थी हे अनुपस्थित राहिले. सीईटीचा निकाल हा 3 जून किंवा त्यापूर्वी जाहीर होईल असं सांगण्यात आलं होतं. पण, त्यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. MHT-CETची परीक्षा ही 2 मे 2019 आणि 13 मे 2019 रोजी घेण्यात आली होती.

निकालावर विद्यार्थ्याचा फोटो

निकालावर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो देखील असणार आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यानं किती वाजता निकाल डाऊनलोड करून घेतला याची माहिती दिली जाईल असं परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलं.

Loading...


VIDEO: काँग्रेसमधल्या कोंडीमुळे राजीनामा दिला, विखे-पाटलांनी व्यक्त केली खदखद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: result
First Published: Jun 4, 2019 02:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...