News18 Lokmat

माढावरून राष्ट्रवादीत खदखद; विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाही?

राष्ट्रवादीपुढे आता माढातील तिढा सोडवण्याचं आव्हान आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 09:26 AM IST

माढावरून राष्ट्रवादीत खदखद; विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाही?

मुंबई, सागर कुलकर्णी , 19 मार्च : माढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये माढातून उमेदवार कोण? यावर खदखद सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आज तिसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये माढाच्या उमेदवारीची देखील घोषणा होऊ शकते. यावेळी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते - पाटील यांचं तिकीट कापलं जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते -पाटील यांनी आता अकलूज या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. यावेळी मोहिते-पाटील आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून पुढील रणनिती ठरण्याची शक्यता आहे. माढामधून प्रभाकर देशमुख यांचं नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे नाराज विजयसिंह मोहिते - पाटील हे अन्य पर्यायाचा विचार करू शकतात का? तसेच केवळ पक्षावर दबावासाठी सर्व सुरू आहे? याकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.


Lok sabha election 2019 अडवाणींच्या गांधीनगरमधून लढणार अमित शहा निवडणूक?


मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही

Loading...

माढामधून विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. दरम्यान, मोहिते-पाटील यांनी त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. पण, राष्ट्रवादीतील नेत्यांचा मात्र त्याला रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर आता विजयसिंह मोहिते-पाटील आता काय भूमिका घेणार? तसेच माढातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? हे पाहावं लागणार आहे. यापूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यावरून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा देखील रंगली होती.

माढामधून शरद पवार यांनी माघार घेत मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर पवारांवर भाजपनं देखील टीका केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्व गोष्टींचा विचार करता शरद पवार यांनी निर्णय घेतल्याचं सांगितलं.


Special Report: पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडियावर खिल्ली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 09:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...