नागपुरात आज मेट्रो धावणार; फडणवीस, गडकरी राहणार उपस्थित

आज नागपूरमध्ये मिहान डेपो ते एअरपोर्ट पर्यंत मेट्रो धावणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपूर मेट्रोच्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर मेट्रो कशी धावते हे लोकांना दाखवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2017 10:33 AM IST

नागपुरात आज मेट्रो धावणार; फडणवीस, गडकरी राहणार उपस्थित

नागपूर,30 सप्टेंबर: विजयादशमीच्या सणानिमित्त आज नागपूरमध्ये मेट्रो धावणार आहे. दरम्यान हा मेट्रोचा डेमो रन पाहण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

आज नागपूरमध्ये मिहान डेपो ते एअरपोर्ट पर्यंत मेट्रो धावणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपूर मेट्रोच्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर मेट्रो कशी धावते हे लोकांना दाखवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मेट्रोच्या या मार्गावर पुढील दोन तीन महिने लोकांना जॉय राईड आयोजित केली जाईल . वर्ष संपेपर्यंत या मार्गावर मेट्रो सुरळीतपणे सुरू होईल असा दावा करण्यात येतो आहे. तसंच महाकार्डचही आज नागपुरात लोकार्पण होणार आहे या कार्डमुळे एकाच कार्डाद्वारे मेट्रो आणि बसचे तिकिट मिळू शकेल.

मे 2015मध्ये नागपूर मेट्रोचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षात मेट्रोचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता पुढच्या वर्षी नागपूरकरांची मेट्रो नियमितपणे धावू लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2017 10:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...