S M L

नागपूर महापालिकेकडे नाहीत पैसे, गडकरींनी सुचवला हा फॉर्मुला

मेट्रोलाही नीधी द्यायचाय आणि महापालिकेलाही उत्पन्न मिळावे यासाठी नागपूर महानगर पालिकेची तब्बल 1 कोटी स्वेअर फुट जागा मेट्रोला विकसित करायला देऊन त्यातून दहा हजार कोटी उभे करण्याचा निर्णय घेतल्याचं नितीन गडकरी म्हणाले.

Updated On: Nov 2, 2018 11:45 PM IST

नागपूर महापालिकेकडे नाहीत पैसे, गडकरींनी सुचवला हा फॉर्मुला

नागपूर, 2 नोव्हेंबर - नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या एकुण 9 हजार कोटी रुपये खर्चा पैकी पाच टक्के नागपूर महानगर पालिकेला द्यायचे आहे. पण महानगर पालिकेकडे कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाच पैसे नसल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपुरचे खासदार नितीन गडकरी यांनी मान्य केले आहे. आता मेट्रोलाही नीधी द्यायचाय आणि महापालिकेलाही उत्पन्न मिळावे यासाठी नागपूर महानगर पालिकेची तब्बल 1 कोटी स्वेअर फुट जागा मेट्रोला विकसित करायला देऊन त्यातून दहा हजार कोटी उभे करण्याचा निर्णय घेतल्याचं नितीन गडकरी म्हणाले.


दरम्यान, या दहा हजार कोटींपैकी पाच हजार कोटी महामेट्रोला आणि पाच हजार कोटी नागपूर महानगर पालिकेला मिळतील असेही गडकरी म्हणाले. दरम्यान आगामी दोन वर्षात म्हणजेच 2020 पर्यंत मुंबईतील एकुण उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांपेक्षा जास्त प्रवाशी मेट्रोने प्रवास करतील, असा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.देशात सध्या ५७० किलोमीटर मेट्रो मार्ग तयार होतोय आणखी १०० किलोमीटर मेट्रो वाढविण्याचा विचार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकराच्या गृहनिर्माण आणि शहरीविकास मंत्रालयाच्यावतीने नागपुरात तीन दिवसीय Urban Mobility India (UMI) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


Loading...

देशभरातील मेट्रो प्रकल्पाचे प्रतिनिधी, विविध देशांचे राजदूत, मेट्रो प्रोजेक्ट मध्ये काम करणार्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र तसेच राज्य सरकारचे अधिकारी इंजिनीअर्स असे हजारावर प्रतिनिधी दाखल झाले आहेत.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणमंत्री नितीन गडकरी आणि गृहनिर्माण आणि शहरीविकास राज्य मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते. देशभरातील बहुतांश सर्वच मेट्रो प्रकल्पाच्या वतीने या ठिकाणी प्रदर्शनही भरण्यात आले आहे.


 VIDEO : क्रिकेटच्या मैदानात फडणवीसांची फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 2, 2018 11:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close