पोलीस दलात खळबळ, #MeToo प्रकरणी IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ज्यांच्यावर रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांनीच जर अशी कृत्य केलीत तर नागरिकांनी जायचं कुणाकडे असा प्रश्न विचारला जातोय.

News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2018 11:06 PM IST

पोलीस दलात खळबळ, #MeToo प्रकरणी IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

प्रविण मुधोळकर, नागपूर, 04 डिसेंबर : बॉलिवूड आणि पत्रकारिेतेच्या क्षेत्रात #MeToo प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली होती आता त्याचं लोण पोलीस दलातही गेलं आहे. या प्रकरणी नागपूरात एका IPS अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.  पी.आर. पाटील असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं त्याच्या विरूद्ध तक्रार दाखल केली होती.


नागपूरच्या लाचलुचपत विभागात पी.आर. पाटील  हे अधिकारी आहेत. त्यांच्या विरूद्ध एका महिला कॉन्स्टेबलनं तक्रार दाखल केली होती. लाचलूचपत विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची विशाखा समितीमार्फेत चौकशी केली. त्या तथ्य आढळल्याने पाटील यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.


या घटनेमुळं नागपूरच्या पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काही पुरावेही पोलीसांच्या हाती लागले आहेत. ज्यांच्यावर रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांनीच जर अशी कृत्य केलीत तर नागरिकांनी जायचं कुणाकडे असा प्रश्न विचारला जातोय.

Loading...


आणखी कुणावर झाले आरोप


या प्रकरणी देशातल्या अनेक मान्यवरांवर आरोप झाले होते त्यात केंद्रीय परराष्ट्रमंत्री एम.जे. अकबर यांचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं. चौफेर दबावानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.


अकबर हे संपादक असल्याच्या काळात या सर्व घटना घडल्याचा दावा महिला पत्रकारांनी केला होता. अकबर भारतात परत आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असंही म्हटलं जात होतं. मात्र त्यांनी राजीनामा न देता खटला दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला होता.


#MeToo या मोहिमेत आरोप करणाऱ्या सर्व पत्रकार या प्रतिष्ठीत वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या आहेत. चौफेर दबाव वाढत असतानाही सरकारने अकबर यांची पाठराखण केली  होती.. आपल्या विरूद्धचे सर्व आरोप हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि प्रतिमा मलिन करण्यासाठीच आहेत असही अकबर यांनी आपल्या खुलाश्यात म्हटलं होतं.


अकबर हे 'द टेलिग्राफ', 'एशियन एज' आणि 'द संडे गार्डियन' या वृत्तपत्रांचे संपादक होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते.


हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणं, मद्य पिण्यासाठी आग्रह करणं, आक्षेपार्ह शेरेबाजी करणं असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले आहेत.


 

VIDEO VIRAL : लाजिरवाणी घटना; वळुला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 10:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...