शेतकऱ्यांच्या संपाला हिंसक वळण, व्यापाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2017 03:26 PM IST

शेतकऱ्यांच्या संपाला हिंसक वळण, व्यापाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण

01 जून : औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या संपाला आज सकाळीच हिंसक वळण लागलं.  औरंगाबादमधील जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना काही व्यापाऱ्यांनी मारहाण करण्यात आली आहे.

जाधववाडी मार्केटमध्ये जयाजीराव सूर्यवंशी त्यांच्या सहकाऱ्यांसह बाजार बंद करण्याचं आवाहन करत होते. याचवेळी काही व्यापाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

व्यापाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध केला तरी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो, कांदे फेकत बाजार बंद करण्याचा प्रयत्नही केला.

दरम्यान, आंदोलनाला सुरुवात करत काही ठिकाणी शेतकऱ्यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली आहे.

निफाड तालुक्यातील नैताळेमध्ये शेतकऱ्यांनी वाहनांच्या काचा फोडल्या. यामुळे पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार करावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2017 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...