News18 Lokmat

बुलढाण्याचे मेरत दांपत्य ठरलं मानाचे वारकरी

परसराव उत्तमराव मेरत ( वय ४२) व त्यांच्या सुविद्य पत्नी अनुसया (वय ४२) अशी या भाग्यवंत दांपत्य वारकऱ्यांची नावं आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2017 04:28 PM IST

बुलढाण्याचे मेरत दांपत्य ठरलं  मानाचे वारकरी

04 जुलै:  बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड तालुक्यातील बाळसमुद्र या छोट्याशा गावातील मेरत कुटुंबाला  यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. परसराव उत्तमराव मेरत ( वय ४२) व त्यांच्या सुविद्य पत्नी अनुसया (वय ४२) अशी या भाग्यवंत दांपत्य वारकऱ्यांची नावं आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी पहाटे विठ्ठलाची पूजा केली.

व्यवसायाने शेतकरी असलेले गरीब घरातील मेरत दांपत्य गेल्या  दहा वर्षापासून ते वारी करतात तर  गेल्या तीन वर्षापासून ते वारीत माउलींच्या पालखीसह पायी सहभागी होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 11:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...