मेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू

मेळघाटातील्या अकोट प्रादेशिक वन विभागात सौंदळा गावाजवळ वान प्रकल्पाचा मुख्य कालवा आहे, या कालव्यात मंगळवारी रात्री एका बिबट्याचा बुडून मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2018 12:10 AM IST

मेळघाटात बिबट्याचा कालव्यात बुडून मृत्यू

अकोला, 21 नोव्हेंबर : मेळघाटातील्या अकोट प्रादेशिक वन विभागात सौंदळा गावाजवळ वान प्रकल्पाचा मुख्य कालवा आहे. या कालव्यात मंगळवारी रात्री बिबट्या पाण्यात पडला. त्याचा तिथेच बुडून मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


घटनेची माहिती मिळताच आरएफओ राजेंद्र कातखेडे यांनी अकोटचे वनपाल अजय बावणे यांच्या पथकाला सोबत घेऊन घटनास्थळ गाठलं आणि कालव्यात पडलेल्या बिबट्याला बाहेर काढलं. पंचनामा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेवरच त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं. यासाठी अकोट आणि तेल्हारा येथील पशू वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर अकोट वन विभागाच्या विश्राम गृह परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.


यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे जंगलातील वन्या प्राण्यांनासुद्धा पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. मेळघाटातसुद्धा जंगलात पिण्याच्या पाण्यासाठी वन्य प्राण्यांना वणवण फिरावे लागत आहे. अनेक प्राणी वान प्रकल्पाच्या कालव्यात पाणी पिण्यासाठी येतात. हा बिबट्या कालव्यात पाणी पिण्यासाठी आला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाण्यात पडल्यानंतर त्याला वरती येता न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

Loading...


 VIDEO: फ्लाईट हुकली म्हणून महिलेने रनवेवर केला विमानाचा पाठलाग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 12:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...