राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी मराठवाड्यातील नेत्याची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्षपद काही महिने रिक्त होते. या पदासाठी मेहबूब शेख, रविकांत वर्पे, सुरज चव्हाण यांची नावे चर्चेत होती.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 10:31 AM IST

राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी मराठवाड्यातील नेत्याची निवड

मुंबई 4 जून : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी मराठवाड्यातील युवा नेते मेहबूब शेख यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान युवक कार्याध्यक्ष पदी रविकांत वर्पे आणि सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्षपद काही महिने रिक्त होते. या पदासाठी मेहबूब शेख, रविकांत वर्पे, सुरज चव्हाण यांची नावे चर्चेत होती.

(पाहा :तुमची मुलं सुरक्षित आहेत? एक वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा CCTV VIDEO समोर)

मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी मेहबूब शेख यांची युवक प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आल्याचे पत्र दिले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये एक खर्डा वक्ता म्हणून मेहबुब शेख यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने मेहबुब शेख यांची निवड केल्यामुळे निवडणुकीत युवकांची मोठी फळी काम करताना दिसणार आहे, पक्षाकडून असा विश्वास यानिमित्तानं व्यक्त करण्यात आला आहे.

(पाहा :VIDEO: वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये निघाल्या अळ्या)

Loading...

SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 10:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...