News18 Lokmat

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर उद्या मेगा ब्लॉक, या वेळेत बंद राहणार वाहतूक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या (22 मे) चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक चार तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 03:24 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर उद्या मेगा ब्लॉक, या वेळेत बंद राहणार वाहतूक

रायगड, 21 मे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या (22 मे) चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक चार तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ओव्हरहेड गँन्ट्री बसवण्याचे कामकाज करण्यात येणार असल्याचे कारणाने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा.. गेवराई तालुक्यात तिहेरी अपघात.. पेटत्या कारमध्ये गरोदर महिलेचा होरपळून मृत्यू

22 मे रोजी दुपारी ते दोन वाजेपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे करण्यात येणार आहे. कालावधीत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक चार तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच सर्व प्रकारची अवजड व माल वाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गवरील किमी 33.500 या ठिकाणी थांबण्यात येणार आहेत.

हेही वाचा..संतापजनक.. लग्नात आलेल्या गतिमंद मुलीवर 55 वर्षीय नराधमाने केला बलात्कार

हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील पर्यायी मार्ग म्हणून खालापूर टोलनाका येथून प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्ग कमांक 4 जूना पुणे-मुंबईवर वळवण्यात येणार आहे. तरी सर्व प्रवासी वाहनचालकांनी खालापूर टोलनाका (सावरली फाटा), चौकफाटा (कर्जत), दांड फाटा, आजिवली चौक, शेडुग फाटा येथून परत एक्सप्रेस वे वरुन मुंबईकडे अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा. सर्व वाहनचालक आणि प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन पनवेल महामार्ग वाहतूक शाखेचे विभागाचे निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

Loading...


VIDEO: निकालाआधीच भाजप समर्थकांकडून विजयोत्सवाची जंगी तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...