गुंता सुटणार का? मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मराठा आरक्षणा संदर्भात आज सकाळी दहा वाजाता सर्वपक्षीय गट नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 08:44 AM IST

गुंता सुटणार का? मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई, 27 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासंदर्भात आज सकाळी दहा वाजाता सर्वपक्षीय गट नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तर विरोधक या बैठकीत मराठा आरक्षण संदर्भात पूर्ण अहवाल विधीमंडळ सभागृहात पटलावर ठेवण्याबाबत ठाम भूमिकेवर आहेत.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण आणि इतर शैक्षणिक सवलती सुविधा योजना सुरू ठेवण्याबाबत आग्रही भूमिका मांडणार अशी भूमिक मराठा आंदोलकांकडून घेण्यात आली आहे. एटीआर रिपोर्ट नाही तर संपूर्ण अहवाल मांडावा ही विरोधी पक्षांच्या गट नेत्यांची भूमिका आहे, अशी माहिती सुत्रांकजून देण्यात आली आहे.

संपूर्ण अहवाल मांडण्यास सरकार अनुकूल नाही तर विरोधकांची मागणी संपूर्ण अहवाल मांडण्याबाबतच ठाम आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे आरक्षणासाठी मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.

29 तारखेला पटलावर मांडण्यात येणारं विधेयक 30 तारखेपर्यंत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीला विनोद तावडे, सुभाष देशमुख, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी निलंगेकर, विष्णू सावरा, एकनाथ शिंदे आणि दीपक सावंत उपस्थित होते.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातला एटीआर म्हणजेच संपूर्ण अहवाल सादर करायचा की नाही यासंदर्भात आज म्हणजे मंगळवारी होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

Loading...

हेही वाचा: #Mumbai 26/11- ‘थोडं घाईत आहे… नंतर फोन करतो’ पण तो फोन कधी आलाच नाही

सरकार आणणार विधेयक एकीकडे विरोधकांनी मराठा आरक्षणावरुन कोंडीत पकडल्यामुळे सत्ताधारी भाजपने अहवालाऐवजी थेट विधेयकच सभागृहात मांडण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी 29 नोव्हेंबरला विधिमंडळात विधेयक मांडण्यात येणार असून, 16 टक्के आरक्षणासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनी दिली. परंतु, मराठा आरक्षण विधेयक जरी सभागृहात मांडण्यात येणार असलं तरी याबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडला जाणार नाही.

त्यामुळे सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत विरोधकांनी आंदोलनं केली.  विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

विधानभवनाबाहेर मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 7 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विधान भवनाबाहेर हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मराठा आरक्षण जाहीर करण्यात यावं, याआधीच्या आंदोलनकर्त्यांवरील खटले मागे घेतले जावेत, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.  ताब्यात घेण्यात आलेले सर्व कार्यकर्ते सोलापूरचे जिल्हातील आहेत.


...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 08:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...