एमबीबीएस करणाऱ्या बिपिननं केली धावत्या रेल्वेत महिलेची प्रसुती

धावत्या रेल्वेत प्रसुती वेदनेनं विव्हळणाऱ्या एका महिलेची व्हाॅट्सअपवरून माहिती घेऊन सुरक्षित डिलिव्हरी करणाऱ्या नागपूरच्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचं सगळ्यांकडून कौतुक होतंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2017 09:14 PM IST

एमबीबीएस करणाऱ्या बिपिननं केली धावत्या रेल्वेत महिलेची प्रसुती

12 एप्रिल : धावत्या रेल्वेत प्रसुती वेदनेनं विव्हळणाऱ्या एका महिलेची व्हाॅट्सअपवरून माहिती घेऊन सुरक्षित डिलिव्हरी करणाऱ्या नागपूरच्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचं सगळ्यांकडून कौतुक होतंय.

मूळचा अकोल्याचा असणारा बिपिन खडसे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस करतोय. बिपिन अकोल्याहून-नागपूरला अहमदाबाद-पुरी एक्‍स्प्रेसने येत होता. यावेळी एक बाळंतीण महिलेला प्रसुती वेदना होत असल्याचं त्याला समजलं. त्यानंतर बिपीनने कॉलेजचे प्राध्यापक अविनाश गावंडे यांना वॉट्सअॅपवरून संपर्क साधून त्यांच्या निर्देशानुसार या महिलेची प्रसुती केली.

ही प्रसुती यशस्वी झाली असून बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. या घटनेबद्दल बिपीनचं कौतुक होतंय. तर थ्री इडिट्स या सिनेमात पाहिलेला प्रसंग प्रत्यक्षात घडल्यामुळे बिपीनचं हे धाडस चर्चेचा विषय ठरलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2017 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...