तुमच्या आशीर्वादामुळे मी आणि माझी टीम सुखरूप - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 25, 2017 03:20 PM IST

तुमच्या आशीर्वादामुळे मी आणि माझी टीम सुखरूप - मुख्यमंत्री

25 मे : निलंग्याहून मुंबईकडे येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळलं. सुदैवाने यात मुख्यमंत्र्यसह सगळेजण सुखरूप आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान,  अपघातानंतर काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करून आपण सुखरूप असल्याची माहिती दिली.

"महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळं मी आणि माझी टीम संपूर्ण सुखरूप आहे. काळजीचं कारण नाही."अशी माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान, शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर 50 फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, यात हेलिकॉप्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं. यानंतर त्यांना लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरी नेण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...