...तर मीही हिंदू धर्म सोडेन-मायावती

...तर मीही हिंदू धर्म सोडेन-मायावती

तसं खाजगी उद्योगात मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांनी आरक्षण द्यावं यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अवस्थेवर त्यांनी टीका केली.

  • Share this:

10 डिसेंबर: जर संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी दलितांविरोधी कारवाई अशीच चालू ठेवली तर मीही बाबासाहेंबाप्रमाणेच  बुद्ध धर्म स्वीकारेन असं विधान उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केलं आहे. त्या नागपूरमध्ये बोलत होत्या.

बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडण्यासाठी हिंदू शंकराचार्य आणि तथाकथित हिंदु धर्मातील तथाकथित ठेकेदारांना २१ वर्षांचा काळ दिला होता. त्यानंतर बाबासाहेबांनी बुध्दाच्या मार्गाचा स्विकार केला होता. त्यांनी आपल्या भाषणात अजूनही अनेक मुद्दे घेऊन सरकार आणि हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली आहे. सरकारच्या ओबीसीविषयक चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण देशात सध्या ओबीसींवर अन्याय होतोय असं विधानही त्यांनी केलंय.

तसं खाजगी उद्योगात मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांनी आरक्षण द्यावं यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अवस्थेवर त्यांनी टीका केली. तसंच त्या मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या न केल्याचा दावा मायावती यांनी केला आहे.

गेल्या काही काळात राजकारणात प्रचंड मागे पडलेल्या मायावती परत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. उत्तर प्रदेशच्या पालिका निवडणुकांमध्ये त्यांनी आता 2 महानगरपालिकांमध्ये विजयही मिळवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 04:15 PM IST

ताज्या बातम्या