News18 Lokmat

तुका म्हणे धावा, आता पंढरी विसावा !

पंढरीच्या वाटेवरचा पालखी सोहळा आता शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचलाय. माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण आज ठाकूरबुवाच्या समाधीजवळ संपन्न झालं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2017 05:31 PM IST

तुका म्हणे धावा, आता पंढरी विसावा !

1 जुलै : पंढरीच्या वाटेवरचा पालखी सोहळा आता शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचलाय. माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण आज ठाकूरबुवाच्या  समाधीजवळ संपन्न झालं. तर जगतगुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज तोंडले बोंडलेच्या टेकडीवर लाडक्या विठुरायाचा धावा बोलतोय.

तुका म्हणे धावा, आता पंढरी हाच विसावा या अभंगाप्रमाणे सर्व वारकऱ्यांना लाडक्या विठुरायाची आस लागलीय. भंडी शेगावला बंधू भेटीचा सोहळा पार पडणार आहे. सोपानदेव आणि माऊलीच्या पालखीची बंधूभेट याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो वारकरी भंडी शेगावात एकत्र जमतात. तुकोबांची पालखी आज पिराची कुरोलीत मुक्कामी असणार आहे तर माऊलींची पालखी भंडी शेगावच्या मुक्कामी पोहोचतेय उद्या या दोन्ही पालख्या वाखरी मुक्कामी असणार आहेत.

वाखरीत शेवटचं आणि सर्वात मोठं गोलं रिंगण आणि शेवटचं उभं रिंगण पार पडतं. हा सोहळा नयनरम्य असाच असतो त्यानंतरच हे दोन्ही पालखी सोहळे पंढरी नगरीत दाखल होतात तर इतर दिंड्या आपापल्या मुक्कामी पोहोचतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2017 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...