माथेरान, 24 डिसेंबर: 3 दिवस सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळं फुलून गेली आहेत. याला माथेरानही अपवाद राहिलेलं नाही. माथेरानही पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलंय.
मुंबई जवळचं थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरानला नेहमीच पसंती दिली जाते. पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी माथेरानमधल्या हॉटेल्सवर आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.
सलग सुट्ट्याच सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटक समुद्र किनाऱ्याबरोबर उंच हवेच्या ठिकाणांनाही पसंती देताना दिसत आहेत. माथेरानसुद्धा पर्यटकांनी फुल्ल झालं असून इथला प्रचंड हवेतील गारवा आणि बोचरी थंडी या सगळ्या वातावरणात पर्यटकांचा वाढता वेग माथेरानमध्ये आहे.
हात रिक्षावाले, घोडेवाले, हॉटेलवाले पर्यटकांच्या सेवेसाठी तत्पर झाले आहेत. खाजगी वाहने, भाड्याच्या टॅक्सीने ही पर्यटक माथेरानपर्यंत पोहचत आहेत तर अमन लॉज पासून काही पर्यटक घोड्यावरून बाजारपेठ अगर पॉईंटवर जाणं पसंत करत आहेत. तर काही पर्यटक अमन लॉज ते बाजारपेठ असा प्रवास घोड्याने करत आहेत.
तर जे वयोवृद्ध प्रवासी आहेत ते हातरिक्षाने माथेरान पर्यंत पोचत आहेत. हॉटेलवाल्यांनी आपआपल्या हॉटेल्सवर रंगीबेरंगी लायटिंग आणि ख्रिसमस ट्री लावून सजावट केली आहे त्यामुळे पर्यटक माथेरानला पसंती देत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा