S M L

उस्मानाबाद : मुरुम बाजारातील मोठा तूर खरेदीत घोटाळा उघड

हमी भावानं तूर खरेदीचे आदेश असताना बाजार समिती प्रशासनानं तब्बल साडे चार हजार क्विंटल तूर हमी भावापेक्षा कमी भावानं केली खरेदी

Samruddha Bhambure | Updated On: May 2, 2017 03:18 PM IST

उस्मानाबाद : मुरुम बाजारातील मोठा तूर खरेदीत घोटाळा उघड

बालाजी निरफळ, उस्मानाबाद

02 मे : कुंपणच शेत खातंय ही म्हण आहे. असाच प्रकार उस्मानाबादच्या मुरुम बाजार समितीत घडला आहे. हमी भावानं तूर खरेदीचे आदेश असताना बाजार समिती प्रशासनानं तब्बल साडे चार हजार क्विंटल तूर हमी भावापेक्षा कमी भावानं खरेदी केली.

बाजार समितीच्या तळावर लावलेले या बोर्डावर पाच हजार पन्नास रुपये क्विंटलनं तूर खरेदी सुरु आहे असं म्हटलयं. पण वस्तूस्थिती तशी नाही. निदान उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरुम बाजार समितीत तरी तशी परिस्थिती नाही. मुरुम बाजार समितीत तब्बल 4 हजार 835 क्विंटल तूर हमी भावापेक्षा खरेदी केलीये. डिसेंबर ते 18 मार्च दरम्यान बाजार समितीत आलेल्या तुरीचा हिशोबच ठेवण्यात आलेला नाही.धक्कादायक बाब म्हणजे बाजार समितीनं तूर खरेदी आणि इतर शेतमाल खरेदी करताना सावकारासारखी भूमिका बजावलीये. बाजार समितीला या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत निबंधकांनी दिलेत.

शेतकरी अडचणीत सापडला असताना सरकारी यंत्रणेनं शेतकरीपुरक भूमिका घेणं आवश्यक आहे. मात्र राज्यकर्त्यांचे आदेश न पाळणाऱ्या बाजारसमितीनं सावकारी थाटात शेतकऱ्यांची पिळवणूक केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2017 03:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close