किंग्जवे रुग्णालयाला भीषण आग, आर्मीच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

नागपूरमधील किंग्जवे रुग्णालयात भीषण आग लागली आहे. यात २० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयाला भीषण आग लागली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2019 03:23 PM IST

किंग्जवे रुग्णालयाला भीषण आग, आर्मीच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

नागपूर, 09 जानेवारी : नागपूरमधील किंग्जवे रुग्णालयात भीषण आग लागली आहे. यात २० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. अग्निशमनच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल  झाल्या असून आग विझवण्याचं शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


किंग्जवे रुग्णालयाच्या अर्ध्या इमारतीमध्ये बांधकाम सुरू होतं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ही इमारत काचेची आहे. त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलं आहे.


रुग्णालयाच्या इमारतीमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि लष्कराचे जवान आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्याने आग अगदी शेवटच्या मजल्यावर पोहचली आहे.

Loading...


मुंबई : कामगार रुग्णालय आग दुर्घटने


गेल्या काही दिवसांआधी मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला आग लागली होती. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला होता तर ३ महिन्यांच्या मुलीचाही समावेश होता. यात १५७ जण जखमी झाले होते. सोमवारी (१७ डिसेंबर) कामगार रुग्णालयात दुपारी आग लागली होती. रुग्णालयाला काचेची तावदानं असल्यामुळे आगीचे धूळ आतच पसरत राहिले. त्यामुळे श्वास कोंडून आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेने भीतीने चौथ्या मजल्यावरुन खिडकीतून उडी टाकली. यातच तिचा मृत्यू झाला.


चौथ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटरजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाने शिडी आणि दोर लावून अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढलं. तसंच टेरेसवरून दोरखंडाच्या सहाय्यानं आगीत अडकलेल्यांना इमारतीबाहेर काढण्याचे प्रयत्न केले गेले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वेळीच रुग्णालयाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावाची कारवाई केल्यामुळे 109 जणांना वाचवण्यात यश आलं.


दरम्यान, एका रुग्णाने आपला अनुभव सांगताना म्हटले की, त्याची MRI चाचणी सुरू होती. त्याच सुमारास रुग्णालयात आग लागली. तेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णाला तातडीनं मशिनमधून बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.


VIDEO : पुण्यात दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून हेल्मेटचं घातलं श्राद्ध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 03:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...