• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: घराला लागलेल्या आगीत 2 लहान मुलांचा होरपळून मृत्यू
  • VIDEO: घराला लागलेल्या आगीत 2 लहान मुलांचा होरपळून मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Oct 1, 2018 12:26 PM IST | Updated On: Oct 1, 2018 12:39 PM IST

    01 ऑक्टोबर: हृदय हेलावणारी ही दुर्दैवी घटना आहे राजापूरच्या साखरी नाटे गावातली. साखरी नाटेतल्या एका घराला आग लागून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 7 वर्षाचा नमिर आणि 5 वर्षाची फातिमा अशी या दोन लहान मुलांची नावं आहेत. नाटे येथे गेल्या दोन दिवसांपासून लाईट नव्हती. त्यामुळे मुद्सर दर्वेश यांनी आपल्या घरात रॉकेलचा दिवा पेटवून ठेवला होता. मात्र हा दिवा लहान मुलांच्या हातून खाली पडला आणि बाजूला असलेल्या कपड्यांनी पेट घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. पेटता दिवा पडल्यामुळे घरात सगळीकडे धूर झाला. यात नमिर आणि फातिमा यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग आणखी भडकण्याचं करण म्हणजे हे घर कौलारू होतं, त्यात घराच्या लाकडाच्या सामानांनी वेगाने पेट घेतला. ही आग इतकी भयंकर होती की आजूबाजूला असणाऱ्या वस्तीतील लोकांना घराबाहेर काढण्यात आलं. रात्री 10 च्या सुमारास ही आग लागली. या मुलांना वाचवण्यासाठी येथील स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी खूप प्रयत्न केले मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी