अमरावतीमध्ये भीषण अग्नितांडव, तब्बल 70 घरांची जळून राख

यामध्ये 70 आदिवासी लोकांची घरं जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. धारणी इथे अग्निशामक यंत्रणा नसल्याने टँकरने आग विझविण्याचे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 09:46 PM IST

अमरावतीमध्ये भीषण अग्नितांडव, तब्बल 70 घरांची जळून राख

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 21 मे: अमरावती जिल्यातील मेळघाटात असलेल्या धारणी तालुक्यातील भुलोरी गावात अचानक आग लागली आहे. यामध्ये 70 आदिवासी लोकांची घरं जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. धारणी इथे अग्निशामक यंत्रणा नसल्याने टँकरने आग विझविण्याचे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत.

बऱ्याच कालावधी नंतर मध्यप्रदेश येथील बऱ्हाणपूरवरून अग्निशामन बंब घटनास्थळी पोहचलं. मात्र ही आग लवकर न आटोक्यात आल्यास मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आगीमध्ये जीवितहानी होण्याची माहितीदेखील देण्यात आली आहे.

हेही वाचा : TikTok स्टारची हत्या, व्हिडिओ शूट करताना झाडल्या गोळ्या

धारणी येथील ग्रामस्थांनी अनेकदा अग्निशामक दलाची मागणी केली असतानादेखील अग्निशामक न मिळाल्याने आदिवासी लोकांसह नागरिक संतप्त झाले आहे. दरम्यान, आगीमध्ये 4 जनावरे सुद्धा जळून खाक झाले आहेत. मात्र प्रश्नासनाची आग विझविण्यात दमछाक झाली.

Loading...

नेमकी कोणत्या कारणामुळे आग लागली याबद्दल अद्याप काहीही समजू शकलेलं नाही. तर आग विझवण्याचं काम अद्याप सुरू आहे. आगीमध्ये तब्बल 70 घरं जळून गेली आहेत. त्यामुळे गावाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

गावात सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही सुविधा नसल्याने गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ होतोय. त्यामुळे सरकार याकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.


SPECIAL REPORT : विवेकला टि्वटरकरांना अशा पद्धतीनं धुतलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 09:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...